Type to search

सेवानिवृत्त फौजदाराची आत्महत्या

नाशिक

सेवानिवृत्त फौजदाराची आत्महत्या

Share

नाशिक | प्रतिनिधी 

ग्रामिण पोलीस दलातून दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या एका फौजदाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना धात्रकफाटा परिसरात घडली. या घटनेने खळबळ उडाली असून सदर उपनिरीक्षकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

पंढरीनाथ हरिभाऊ सोनवणे (६० रा.धात्रकफाटा) असे आत्महत्या करणाºया उपनिरीक्षकाचे नाव आहे. सोनवणे ग्रामिण पोलीस दलात कार्यरत होते. खात्यांतर्गत परिक्षा देवून ते उपनिरीक्षक पदावर पोहचले होते.

दोन वर्षापूर्वी ते निवृत्त झाल्याने धात्रक फाटा परिसरात वास्तव्यास होते. दरम्यान मंगळवारी रात्री त्यांनी पेठरोडवरील बांबूज हॉटेल समोरील मोकळ््या मैदानावर असलेल्या गुलमोहराच्या झाडाला अज्ञात कारणातून गळफास लावून आत्महत्या केली.

ही बाब बुधवारी (दि.२९) पहाटे म्हसरूळ पोलीसांचे गस्ती पथकाच्या निदर्शनास आल्याने उघडकीस आली. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!