Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर, मात्र समाधानी नाही – सुन्नी वक्फ बोर्ड

Share

ps:ani

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

भारतातील बहुप्रतीक्षित अयोध्या खटल्याचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणेही नोंदवली.

आस्था आणि श्रद्धेपेक्षाही न्याय सर्वश्रेष्ठ असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. अयोध्यातील पाच एकर जमीन श्री राम जन्मभूमी न्यासाला देण्याचे न्यायालयाने घोषित केले. तर दुसरीकडे, दुसरे पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डालाही अयोध्येतच 5 एकर जागा देण्याचे निकालात म्हटले आहे.

दरम्यान, या निकालाचे स्वागत वल्फ बोर्डाने केले असले तरी निकालातून समाधानी नसल्याचे त्यांनी मांडले. सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील जिलानी यांनी निकालाचे स्वागत करतानाच हा निकाल समाधानकारक नसल्याचे म्हटले. तर आम्ही ज्येष्ठ विधिज्ञ राजीव धवन यांच्याशी चर्चा करून पुढील कायदेशीर बाबी पडताळून पाहू असे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा आम्ही आदर करतो, आणि समाजातील सर्व घटकांना आवाहन करतो की, त्यांनी शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नये, असेही जिलानी यांनी सांगितले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!