‘नामको’वरील रिझर्व बँकेचे निर्बंध मागे; सभासदांना १५ टक्के लाभांश

सातपूर । प्रतिनिधी

नाशिक मर्चटस् बँकेचा 31 मार्च 2019 अखेर निव्वळ एनपीए 6 टक्यांच्या आंत आणल्यामुळे नामको बँकेवर लादलेले सर्व निर्बध रिझर्व्ह बँकेने संपुष्टात आणले असल्याची माहीती चेअरमन सोहनलाल भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत चेअरमन सोहनलालजी भंडारी, व्हाईस चेअरमन अविनाशजी गोठी, जनसंपर्क संचालक भानुदासजी चौधरी,माजी अ.वसंत गिते मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक ठाकूरआदींसह संचालक होते.

यावेळी श्री भंडारी यांनी सन 2014 पुर्वी संचालक मंडळाच्या कार्यकाळात नामको बँकेचा ढोबळ एनपीए 4 टक्के होता. मात्र प्रशासकाच्या कार्यकाळात तोच बँकेचा ढोबळ एनपीए 12 टक्के, मार्च 2017 मध्ये 24 टक्के तर मार्च 2018 मध्ये 29 टक्के झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने नामको बँकेवर अनेक निर्बध जारी केले असल्याची माहीती दिली.

संचालक व कर्मचारीवृंद यांच्या प्रयत्नाने नामको बँकेचा जानेवारी 2020 अखेर ढोबळ एनपीए 10 टक्यांच्या आंत व निव्वळ एनपीए 6 टक्यांच्या आत आणल्यामुळे रिझर्व्ह बँकेने दि.6 फेब्रुवारीला पत्र पाठवून नामको बँकेवर लादलेली सर्व बंधने समाप्त केल्याच कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानुसार नामको बँक आजपासून रिझर्व्ह बँकेने लादलेल्या सर्व बंधनातून मुक्त होण्यासोबतच बँकेवरील निर्बध उठल्यामुळे सभासदांना 15 टक्के लाभाश देणे शक्य झाले आहे.

यानिर्णयामुळे नामको बँकेवर सभासदांना लाभांश देणे, नवीन शाखा उघडणे, बांधकाम व्यवसायिकांना पतपुरवठा करणे अशा अनेक बाबींवर बंधने हटवण्यात आलीआहेत. तसेच कर्ज मंजूरीची कमाल मर्यादा पूर्ववत केल्यामुळे वैयक्तिक कर्ज कमाल मर्यादा 45 कोटी व समूह कर्ज मर्यादा 120 कोटीं कोटी होण्याचे मार्ग मोकळा झालेला असून यामुळे नामको बँकेच्या कर्जदारांची अडचण दूर होणार असल्याचे सोहनलाल भंंडारी यांनी सांगितले.

यापत्रकार परिषदेत संचालक हेमंत धात्रक, प्रकाश दायमा, शिवदास डागा, नरेद पवार, सुभाष नहार, रंजन ठाकरे, हरीष लोढा, गणेश गिते, विजय साने, प्रफुल्ल सचेती, महेंद्र बुरड, कांतीलाल जैन, संतोष धाडीवाल, अशोक सोनजे, प्रशात दिवे, शोभाताई छाजेड, रजनीताई जातेगांवकर,तज्ञ संचालक अरुण कुमार मुनोत, विजय कारे, एनपीए सल्लागार एकनाथ निकम उपस्थित होते.

प्रशासकीय कार्यकाळात बँकेने अनेक चांगले कर्जदार, उद्योजक, ठेवीदार गमावले त्या सर्वांसह नाशिक शहर व नामको बकच्या कार्यक्षेत्रातील सर्व ग्राहकांना व सभासदांना संचालक मंडळातर्फे आवाहन करण्यांत येत आहे की, नामको बँक आपली बँक आहे व बँकेच्या अडचणीनंतरच्या गरुडझेपेत आपण ग्राहकाच्या रुपाने आपला सहभाग नोंदवावाव बँकेच्या प्रगतीला हातभार लावावा.

  • सोहनलाल भंडारी (चेअरमन, नामको)

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *