11 कोटी 68 लाखांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने स्वीकारलेल्या नाहीत

0

जिल्हा बँक सर्वोच्च न्यायालयात जाणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा बँकेकडील 8 नोव्हेंबर पूर्वीच्या 1000, 500 रुपयांच्या 11 कोटी 68 लाखांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने स्वीकारलेल्या नाहीत. या नोटा सध्या बँकेत पडून आहेत. रिझर्व्ह बँकेने या नोटा स्वीकाराव्यात यासाठी राज्यातील अन्य बँकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार नगरची जिल्हा बँकही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर पूर्वीच्या 1000, 500 रुपयांच्या 11 कोटींच्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वत्र एकच धावपळ उडाली. सुरुवातीला जिल्हा बँकेत जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी नव्हती. मात्र, नाबार्डने हस्तक्षेप केल्यानंतर जिल्हा बँकेला नोटा बदलू देण्यास परवानगी मिळाली. जिल्हा बँकेकडे जुन्या नोटापोटी 319 कोटी रुपये जमा झाले होते. रिझर्व्ह बँकेने टप्प्या टप्प्याने या नोटा बदलून घेतल्या. मात्र, जिल्हा बँकेकडे आजही नोटा बंदीची घोषणा होण्यापूर्वीच्या 11 कोटी 68 लाखांच्या नोटा पडून आहेत.

या नोटा स्वीकारण्याबाबत जिल्हा बँकेला वेळोवळी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्याप रिर्झव्ह बँक 11 कोटी 68 लाखांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास तयार नाही. यामुळे रिझर्व्ह बँकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष गायकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

*