Friday, May 3, 2024
Homeराजकीयसरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष

सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील 783 निवडणुकांचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला.त्यामुळे आता सरपंचपदाच्या आरक्षणाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले असून येत्या एक-दोन दिवसात आरक्षण सोडतची तारिख निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दै.देशदूतशी बोलताना दिली.

निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत घेण्याचे अधिकार जिल्हापातळीवर देण्यात आले आहे. येत्या एक-दोन दिवसात सरपंच आरक्षण सोडतसाठी तारिख निश्चित करण्यात येईल.

- Advertisement -

अभिजीत राऊत,जिल्हाधिकारी

सरपंचपदाचे आरक्षण यापूर्वी निवडणुकीपूर्वी निश्चित केले जात होते. मात्र आता निवडणूक झाल्यानंतर आरक्षण काढण्याबाबत सरकारने निर्णय घेतला असून आरक्षण सोडतीचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

जिल्ह्यात 783 ग्रामपंचायतीच्या पैकी 93 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या.तर 687 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या.मंगळवारी निकाल घोषित करण्यात आला आहे.त्यामुळे आता 7213 विजयी उमेदवारांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

घोडेबाजार होण्याची शक्यता

गा्रमपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर आरक्षण जाहीर होणार असल्यामुळे सरपंचपदाच्या निवडणुकीत घोडेबाजार वाढण्याची शक्यता असल्याची राजकीय गोटात चर्चा सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या