Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedभुसावळ : एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण फुल्ल

भुसावळ : एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण फुल्ल

गाड्या सुटण्याबाबत साशंकता : लॉकडाऊन वाढल्यामुळे होणार हिरमोड

भुसावळ –

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे देशभरातील पॅसेंजर रेल्वे गाड्या पूर्णत: रद्द करण्यात आल्या आहे. मात्र रेल्वे गाड्या कधी सुरु होतील याबाबत स्पष्ट आदेश नाहीत मात्र दि.15 एप्रिल पासूनचे आरक्षण सुरु झाले आहे. त्यातही बहुतांश गाड्यांची आता वेटींग लिस्ट सुरु झाली आहे.लॉॅकडाऊन वाढल्याने मात्र प्रवाशांचा हिरमोड होणार आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे अनेक नागरिक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. तर काही नागरिक नोकरी व कामानिमित्त गेलेल्या ठिकाणी अडकून आहेत. ते परतण्याची वाट पाहत आहेत.एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या सुरु होतील किंवा नाही याबाबत निश्चित सुचना नसल्या तरी रेल्वेकडून ऑनलाईन आरक्षण सुरु करण्यात आले आहे. त्यातही काही दिवसातच वेटिंग लिस्ट सुरु झाली आहे. काही गाड्यांना 12 मे पर्यंतची वेटींग दिसून येत आहे. तर बहुतांश गाड्यांना एप्रिल महिना अखेरपर्यंत वेटींग आहे.

सुरत, अहमदाबाद मार्गावर अधिक वेटींग – गाड्या धावतील किंवा नाही याबाबत निश्चित नसले तरी नेहमी प्रमाणे सुरत, अहमदाबाद मार्गावतील बहुतांश गाड्यांना साधारण महिना अखेरपर्यंत वेटींग आहे. यात प्रामुख्याने हावडा अहमदाबाद एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस, ताप्ती गंगा एक्सप्रेस, प्रेरणा एक्सप्रेस, पुरी अहमदाबाद एक्सप्रेस, हावडा पोरबंदर ओखा एक्सप्रेस सह पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.

मुंबई मार्गावर- कुशीनगर एक्सप्रेस, दरभंगा एलटीटी एक्सप्रेस, कामायणी एक्सप्रेस, गितांजली एक्सप्रेस, पुष्पक एक्सप्रेस, गोरखपुर एक्सप्रेस, गोरखपुर पनवेल एक्सप्रेस, पाटलीपुत्र एलटीटी, सेवाग्राम एक्सप्रेस, हावडा मेल, मंगला लक्षद्विप एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे या शिवाय काही गाड्यांमध्ये आरक्षण शिल्लक असल्याची ही परिस्थिती आहे.

नागपूर मार्ग-विदर्भ एक्सप्रेस, ज्ञानेश्वरी डिलक्स, आझाद हिंद एक्सप्रेस, शालीमार एक्सप्रेस, एलटीटी वाराणसी एक्सप्रेस,गितांजली एक्सप्रेस, अलाहाबाद पुरी एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस, पुणे हटिया एक्सप्रेस, पुणे-हटीया एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस.
पुणे- या मार्गावरील काही गाड्यांमध्ये आरक्षण शिल्लक आहेत. तर झेलम एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, आझादहिंद एक्सप्रेस, ज्ञानगंगा सुपर फास्ट या गाड्यांना वेटींग कायम आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या