Friday, May 10, 2024
Homeदेश विदेश…तर देशात स्वस्तात मिळणार करोनाचे औषध

…तर देशात स्वस्तात मिळणार करोनाचे औषध

सार्वमत

नवी दिल्ली – करोनावर उपचारासाठी औषध आणि लसीबाबतचे संशोधन सुरु आहे. त्या पार्श्‍वभूमीवर फेविपिरवीर औषधांच्या वैद्यकीय चाचणीला मंजुरी देण्यात आली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेचे (सीएसआयआर) संचालक शेखर मांडे यांनी याबाबतची माहिती दिली. औषध महानियंत्रक कार्यालयाने (डीजीसीआय) फेविपिरवीरसोबतच फायटोफार्मास्यूटिकल या औषधाच्या चाचणीलाही मंजुरी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाली, तर करोनावरील उपचारासाठी एकदम कमी किमतीत औषध उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

पांडे यांनी सांगितले, एका आठवड्यात या औषधाची चाचणी सुरू होणार आहे. सीएसआयआर अनेक प्रतिष्ठित औषध कंपन्यासोबत काम करीत आहे. करोनावर औषध तयार करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. काही कंपन्यासोबत वैद्यकीय चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत. डीजीसीआयने आम्हाला दोन औषधांची चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. फायटोफार्मास्यूटिकल औषध हे झाडांपासून बनले असून, यात कोणत्याही कंपाऊंड्सचे मिश्रण नाही.

फेविपिरवीर सुरक्षित औषध आहे. या औषधाची चाचणी करण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ही चाचणी यशस्वी झाली, तर लवकरच कमी किमतीत करोनावरील औषध उपलब्ध होईल. फेविपिरवीर एक जुने औषध आहे. याचा पेटंट आता इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे करोनावर औषध निर्मिती करण्यासाठी कुणाची परवानगी लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.

फेविपिरवीर औषधाचा वापर जपान, चीन आणि अन्य काही देशात इन्फ्लूएन्जाच्या उपचारासाठी करण्यात येतो. सीएसआयआर सध्या एका देशी जडीबुटीला जैविक औषध म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचा डेंग्यूवरील उपचारासाठी वापर करण्यात येतो. करोनाविरुद्ध लढण्याची त्याची क्षमता आहे का, हे तपासले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या