कडाक्याच्या थंडीत जवानांनी वाचवले १५० जणांचे प्राण

0
गंगटोक : हुडहुडी भरायला लावणारं शून्य अंशाहूनही कमी तापमान, जीवघेणी बर्फवृष्टी, दूरदूरपर्यंत राहायला सुरक्षित जागा नाही… अशा परिस्थितीत लाचूंग घाटात अडकलेल्या १५० पर्यटकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची कामगिरी भारतीय सैन्याच्या जवानांनी केली आहे. जीव धोक्यात घालून जवानांनी केलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर जवानांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
त्रिशक्ती कॉर्प्सच्या मुख्यालयाला १५० प्रवासी लांचूंग घाटात प्रचंड बर्फवृष्टीत अडकले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी तातडीने बचावकार्य करत लागले. प्रवाशांसाठी सुरक्षित ठिकाण नसल्याने स्वत:च्या बराकींमध्ये त्यांना जागा दिली. बचावकार्य करताना एका महिलेचा हात फ्रॅक्चर झाल्याचे कळल्यावर लगेच तिला औषधं देण्यात आली. प्रवाशांकडे खाण्या-पिण्यासाठी काहीच नव्हते. तेव्हा सैनिकांनी स्वत: अर्धपोटी राहून प्रवाशांना जेवण दिले. त्यांचा हा त्याग पाहून प्रवासीही भावनिक झाले.
शून्य अंशाहून कमी तापमान, जीवघेणी बर्फवृष्टी, दूर दूरपर्यंत राहायला सुरक्षित जागा नाही अशा परिस्थितीत १५० प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवून त्यांची गैरसोय होणार नाही याचा चोख बंदोबस्त सैन्याच्या जवानांनी केला. सर्वांनीच जवानांच्या धाडसाचे आणि त्यागाचे कौतुक केले. काही दिवसांपूर्वी अडकलेल्या ३ हजार प्रवाशांनाही जवानांनी अशाच प्रकारे वाचवले होते.

 

LEAVE A REPLY

*