‘नाकृबास’सभापती पिंगळेंवर अविश्वास ठरावासाठी निवेदन

0
नाशिक ।  नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती देविदास पिंगळे यांच्यावर न्यायालयीन कारवाई झालेली आहे. तसेच त्यांच्या कार्यकीर्दीत समिती आणि शेतकरी हिताविरूद्ध कामकाज झालेले आहे. त्यामूळे बाजार समितीची बदनामी झाल्याचे म्हणत संचालकांनी पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांंडे विशेष सभेची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे.

जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांना दिलेल्या निवेदनावर बाजार समितीच्या 26 संचालकांपैकी सुमारे 15 संचालकांच्या स्वाक्षरी आहे. निवेदनात म्हटले आहे की, सभापती देविदास पिंगळे सुरुवातीपासून कार्यकारणीतील संचालकांना विश्वासात घेत नव्हते.

परस्पर निर्णय घेऊन कामकाज करीत. कर्मचार्‍यांचे महागाई भत्त्याचे सुमारे 57 लाख रुपये दमदाटी करून परस्पर हडप केल्याने न्यायालयाने पिंगळे यांना कोठडी सुनावली होती.त्यांना नाशिकमधून हद्दपार करण्यात आलेले आहे. समितीच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये, असा आदेश न्यायालयाने दिलेले आहे. वाईट पार्श्वभूमी असलेले पिंगळे हे सभापतीपदावर असल्याने संचालकमंडळ आणि समितीची बदनामी होत आहे.

सभापतीपदाचा उपयोग करून पिंगळे यांनी समितीच्या सभांमध्ये विषय पत्रिकेवर आलेले विषय चर्चा न करता आणि मनमानीने इतर विषय त्यात घुसवून त्यांचे इतिवृत्त लिहून घेण्याचा प्रकार केलेला आहे. त्याला सदस्यांनी विरोध केला तरी सभापती म्हणून पिंगळे यांनी गैरप्रकार रेटून नेले आहेत.

समितीच्या ज्या सभेत संचालकांनी एखाद्या विषयावर विरोध दर्शवला, त्या विषयाचे इतिवृत्त सभेच्या कामकाजा नोंदवू न देण्याचा हेतुपरस्पर कारभार पिंगळे यांनी केल्याचा आरोप, संचालकांनी केला आहे. समितीचे हित साधण्याचे सोडून देविदास पिंगळे यांनी स्वप्रसिद्धीसाठी बाजार समितीचे पैसे वापरले, असा आक्षेप संचालकांनी निवेदनात नोंदवला आहे.

बाजार समितीवर सुमारे 121 कोटी रुपयांचे कर्ज होते. शिखर बँकेने समोपचार परतफेड योजनेतंर्गत 44 कोटी रुपये माफ करून समितीला 77 कोटी रुपये 2014 पर्यंत परतफेड करण्याची मुदत दिली होती. त्या मुदतीत सभापतींनी रकम परतफेड केली नाही. त्यामूळे बाजार समितीला पुन्हा शिखर बँकेने दिलेली सवलत काढून घेतल्याचे पत्र दिले. त्यामूळे बाजार समितीचे सुमारे 44 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

त्यामूळे पिंगळे यांना सभापती पदावरून दूर करण्यासाठी संचालकांनी अविश्वास ठराव आणण्याचे ठरवले असून त्यासाठी कृषी उत्पन्न समिती खरेदी-विक्री विकास व विनिमय अधिनियमन 1963 च्या तरतुदीनुसार विशेष सभा आयोजित करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रभारी सभापती शामराव गावित , संचालक शिवाजी चुंभळे, तुकाराम पेखळे, युवराज कोठुळे, विमलबाई जुंद्रे, ताराबाई माळेकर, विश्वास नागरे, संजय तुंगार, रविंद्र भोये, भाऊसाहेब खांडबहाले, जगदीश अपसुंदे, संदीप पाटील, चंद्रकांत निकम यांनी केली. या 15 संचालकांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

LEAVE A REPLY

*