धुळ्यात प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा

0

धुळे, दि. 26 – समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी सिंचन विहिरींचे  जिल्ह्यासाठी सात हजार 866 विहिरींचे उद्दिष्ट असून सुमारे पाच हजारांवर विहिरींचे काम सुरू आहे. आतापर्यंत 1637 विहिरींचे काम पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

भारतीय प्रजासत्ताकाचा 68 वा वर्धापन दिन सोहळा आज उत्साहात  झाला. यानिमित्त पोलिस कवायत मैदानावर मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानिमित्त पोलिस कवायत मैदानावर संचलन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यावेळी पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते.

यावेळी महापौर कल्पना महाले, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहाचे समादेशक चंद्रकांत गवळी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (निवडणूक), राजेंद्रकुमार पाटील, पंकज चौबळ, रवींद्र भारदे (भूसंपादन), जिल्हा पुनर्वसन अधिकारी शुभांगी भारदे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार अनिल गावित, दत्ता शेजूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ, कार्यकारी अभियंता विनोद भदाणे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, वरीष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*