Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा क्षेत्रियपातळीवर राहण्यासाठी अधिवेशन रविवारपूर्वी पूर्ण करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Share
कोरोना : नागरिकांनी भिती न बाळगता काळजी घ्यावी : मुख्यमंत्र्यांचे आवाहन; Corona : Citizens should care without fear: Chief Minister

मुंबई :

महाराष्ट्रात कोरोनाचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील 8 पुणे येथे तर 2 मुंबई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांमध्ये कुठल्याही गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून आली नसून त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. सतर्कता बाळगावी, असे आवाहन करतानाच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन क्षेत्रिय स्तरावर असावे यासाठी विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज नियमाच्या अधीन राहून शनिवार किंवा रविवारपर्यंत पूर्ण करण्यात येईल. विना प्रेक्षक आयपीएल सामन्यांसंदर्भात कुठलाही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे पत्रकारपरिषदेत दिली.

कोरोनाबाबत राज्य शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत माहिती देण्यासाठी विधानभवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, 40 जणांचा समूह दुबईहून भारतात आला. त्यातील बाधा झालेल्यांपैकी 10 जण आहेत. त्यातील सर्वांशी संपर्क झाला असून 3 व्यक्ती कर्नाटकच्या आहेत. या समूहातील चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

नागरिकांनी घाबरुन न जाता सार्वजनिक कार्यक्रमांना होणारी गर्दी टाळावी. परदेशात जाऊन आलेल्या व्यक्तींनी 14 दिवस घरामध्ये थांबावे. राज्य शासन कोरोनासंदर्भात दर दोन तासांनी आढावा घेत आहे. खासगी प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. अतिशय जबाबदारीने काम करणाऱ्या खासगी प्रयोगशाळेला केंद्राच्या परवानगीनंतरच चाचणीचे काम दिले जाईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना नागरिकांमध्ये जाता यावं, त्यांना दिलासा देता यावा यासाठी अधिवेशनाचे कामकाज शनिवार किंवा रविवारपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय विधानपरिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विधापरिषद उपसभापती, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, गटनेते यांच्या बैठकीत घेण्यात आला, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आयपीएल सामने विनाप्रेक्षक खेळविण्याबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!