Type to search

Featured maharashtra

लवकरच लागू होणार घरभाड्याचा कायदा; भाडेकरूंना मिळणार दिलासा

Share

मुंबई- लवकरच देशात दुकान आणि घर भाड्यानं घेणं आणि देणं सोपं होणार आहे. उछइउ आवाजच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाडेकरूंसाठी करण्यात येणार्‍या कायद्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. मंत्रालयात या विधेयकाला मंजुरी मिळवण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेटच्या भाषणात सांगितलं होतं की, सरकार भाडेकरूंसाठी आदर्श कायदा करणार आहे. सध्याचे कायदे जुने आहेत. ते मालक आणि भाडेकरू यांचे प्रश्न सोडवायला असमर्थ आहेत.

  • काय आहे नवा कायदा?
  • नव्या कायद्याप्रमाणे घरमालक 3 महिन्यांपेक्षा जास्त सिक्युरिटी डिपॉझिट घेऊ शकत नाही.
  • घर रिकामं करायचं असेल तर 1 महिन्यात सिक्युरिटी डिपॉझिट परत करावं लागेल.
  • घरमालकानं घराचं नूतनीकरण केलं तर भाडं वाढवू शकतो.
  • घरमालकाला घरी येण्याआधी 1 दिवस नोटिस द्यावी लागेल.
  • भांडणं, वाद असतील तर कोर्टाऐवजी खास भाडं ट्रायबुनल तयार केली जातील.
  • भाडेकरू ते घर दुसर्‍या कुणाला भाड्यानं देऊ शकत नाही.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!