Type to search

Featured नाशिक

‘सारथी’ची वित्तीय स्वायत्तता काढली; अप्पर मुख्य सचिव करणार चौकशी

Share

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील मराठा, कुणबी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेमध्ये (सारथी) तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे या संस्थेच्या कारभाराची सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांच्यामार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे.

या संस्थेची स्वायत्तता कायम ठेवताना वित्तीय स्वायत्तता मात्र काढण्यात येत असून यापुढे वित्तीय निर्णय सरकारच्या मान्यतेने घ्यावे लागतील, असेही बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. सारथी गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने पुणे येथील सारथीच्या मुख्यालयात जाऊन या प्रकरणाची चौकशी केली होती.

त्यानंतर या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. संस्थेच्या व्यस्थापकीय संचालकांनी मनमानीपणे कारभार करून मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा दावाही त्यांनी केला. सारथीअंतर्गत येणार्‍या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, विद्यावेतनाचे पैसे थकित असल्यास ते येत्या पंधरा दिवसांच्या आत दिले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!