दोन्ही कर्मचार्‍यांचा जामीन अर्ज फेटाळला

0

प्रभात डेअरी खरेदी विभाग अपहार प्रकरण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – प्रभात डेअरीच्या खरेदी विभागात अपहार केलेल्या बापू विनायक गायके व आनंद पांडुरंग वाघ या दोन कर्मचार्‍यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे. येथील प्रभात डेअरी कंपनीमध्ये खरेदी विभागात कार्यरत असलेले कर्मचारी बापू विनायक गायके (रा. गेवराई, जि. बीड) व त्याचा सहायक आनंद पांडुरंग वाघ (रा. रांजणखोल, ता. राहाता) या दोघांनी 2013-14 ते जुलै 2018 पर्यंत कंपनीच्या खरेदी विभागात मोठ्या प्रमाणावर अपहार केल्याचे अंतर्गत लेख परीक्षकांच्या लक्षात आल्याने या विभागाचे या कालावधील लेखापरीक्षण केले असता बापू गायके व आनंद वाघ या दोघांनी अपहार केल्याचे पुरावे सापडले. या पुराव्याच्या आधारे 12 जुलै 2018 रोजी कंपनीने या आरोपींविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

या दरम्यान दोन्हींही आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालय श्रीरामपूर यांच्याकडे अर्ज दाखल केले होते. मात्र न्यायालयाने ते फेटाळल्याने या दोघांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानअर्ज दाखल केले होते. मात्र हायकोर्टाने देखील या दोन्ही आरोपींचे अर्ज क्रं. एबीए/831/2018 व एबीए 796/2018 नाकारले आहेत. हे दोन्ही आरोपी पसार आहेत. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय शिंदे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*