सॅनिटरी नॅपकिन करमुक्तीची मागणी – राष्ट्रवादी महीलांचे आंदोलन

0
नाशिक । महीलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकिन जीएसटी करप्रणालीतून वगळल गेलें नाही याचा निषेध म्हणून नाशिक राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांना सॅनिटरी नॅपकिन्सची भेट पोस्टाद्वारे पाठवण्यात आली.

भारतात नव्याने वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायदा लागू करण्यात आला आहे. जीएसटी मध्ये जीवनावश्यक वस्तू करमुक्त करणार व चैनीच्या वस्तूंवर कर लागू करण्याचे ठरवण्यात आले. सॅनिटरी नॅपकिन जीएसटी मधून कर मुक्त व्हावे हि संपूर्ण देशातील महिलांची मागणी आहे असे असताना जीएसटी मधून वेगवेगळ्या वस्तूंवर असलेला कर बदलण्याची भूमिका आज सरकारने घेतली आहे.

त्यात टिकली, सिंदूर, बांगड्या, पूजासाहित्य करमुक्त करण्यात आले मात्र सॅनिटरी नॅपकिन सारख्या अत्यावश्यक वस्तूंवर कर कायम ठेवण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिन ही महिलांसाठी चैनीची वस्तू नाही तर आरोग्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सॅनिटरी नॅपकिनवर कर माफी न देणे म्हणजे महिलांच्या अधिकारांवर अन्याय करणे आहे.

आज भारतात स्त्री ला स्त्री असण्यासाठी कर भरावा लागणार आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी केले. याआधीही सॅनिटरी नॅपकिन वरील जीएसटी कर रद्द व्हावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती.

तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन पत्रही दिले होते. मात्र तरीही सॅनिटरी नॅपकिन करमुक्त केले नाही. याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी महीला काँग्रेसच्यावतीने गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात आल्याचे बलकवडे यांनी सांगितले. यावेळीशहराध्यक्षा, सुनिता निमसे, प्रदेश पदाधिकारी भारती पवार ,जि प च्या अपर्णा खोसकर , पुष्पलता उदावंत , अनिता भामरे , वंदना भामरे , संगीता ढगे, वैशाली गोसावी, कोमल निकाळे आदिंसह महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*