रिलायन्स जिओचा नवा धमाका; लवकरच ५०० रुपयांत ४जी फोन

0

नाशिक, ता. ५ : जिओनंतर कार्डनंतर आता रिलायन्स जिओ नवीन धमाका करणार आहे. त्यामुळे भल्या भल्या मोबाईल निर्मात्या कंपन्यांना घाम फुटू शकतो.

या नव्या धमाक्यानुसार लवकरच आपला बहुचर्चित ४ जी व्हीओएलटीई फिचर फोन बाजारात आणणार आहे.

या फोनची कुणालाही परवडेल अशी केवल ५०० रुपये इतकी असेल.

त्यामुळे ज्यांच्याकडे २जी, ३जी मोबाईल किंवा फिचर फोन होते. त्यांना अगदी कमी किंमतीत ४ जी फोनचा लाभ घेता येणार आहे.

तसेच जिओ मोबाईलच्या डाटा आणि मोफत कॉलिंगचा फायदाही त्यांना होणार आहे.

हा फोन याच महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओच्या २१ जुलैच्या वार्षिक सभेत याची घोषणा शक्य असल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.

जिओने मागील वर्षी ४ जी आणले, पण बहुसंख्य मोबाईल वापरकर्ते हे २ जी आणि ३जी धारक होते. तसेच बाजारात या प्रकारच्या फोनची किंमत किमान ३ ते ४ हजाराच्या पुढे असल्याने अनेकांनी जीओ   सिम ऑफर स्वीकारली नाही.

मात्र या नव्या फिचर्स फोनमुळे हे लोकही जिओकडे वळतील. त्यामुळे येणाऱ्या काळात या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच जिओचा ग्राहक वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*