Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पुणे, मुंबई येथून  अकोलेत आलेल्या १२० लोकांची  ग्रामीण रुग्णालयात नोंद 

Share
अकोले (प्रतिनिधी) – अन्य जिल्ह्यातुन विशेषतः पुणे, मुंबई येथून आलेल्यामध्ये काल दिवसभरात जवळपास १२० लोकांनी आपली नोंद अकोले ग्रामीण रूग्णालयात केली आहे.अशी माहिती  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब मेहेत्रे यांनी दिली.
  कोरोना आजाराच्या निर्मुलनासाठी सुरु असलेल्या लढाईत बाहेरून आलेल्या लोकांची नोंद ठेवण्याचे निर्देश तहसिलदार यांनी दिले होते.त्यासाठी ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र याठिकाणी नोंद करण्यास सांगितले होते.
त्यानुसार पुणे,मुंबई व बाहेरील जिल्ह्यातुन येणारे लोकांची नोंद ठेवली जात असुन काल दिवसभरात शहरातील ग्रामीण रूग्णालयात जवळपास १२० लोक बाहेरून आल्याची नोंद करण्यात आली आहे.शहर व तालुक्यातुन पुणे -मुंबई सह शहरी भागात नोकरी व शिक्षणासाठी गेलेले मोठ्या प्रमाणात लोक गावाकडे येत असून त्याची नोंद होऊन त्याची प्राथमिक तपासणी होऊन त्यानी १४ दिवस  घराबाहेर जाऊ नये अशा सुचना दिल्या जात आहे.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!