Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पुणे, मुंबई येथून खारे कर्जूने येथे आलेल्या 109 जणांची नोंद

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – अन्य जिल्ह्यांतून विशेषतः पुणे, मुंबई येथून खारे कर्जूने येथे आलेल्या 109 जणांची माहिती तेथील ग्रामपंचायतीने संकलित करुन जिल्हा आरोग्य विभागाला दिली आहे.

कोरोना विषाणूच्या निर्मुलनासाठी सुरु असलेल्या लढाईत खबरदारी म्हणून अन्य जिल्ह्यांतुन गावात आलेल्यांची नोंद ठेवण्याचे निर्देश तहसिलदारांनी दिले आहेत. त्यासाठी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याठिकाणी नोंद करण्यासही सांगितले आहे.

त्यानुसार पुणे, मुंबई व अन्य जिल्ह्यांतुन येणार्‍या लोकांची नोंद ठेवली जात आहे. दरम्यान शहर व तालुक्यातुन पुणे -मुंबई सह शहरी भागात नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्ताने गेलेले लोक मोठ्या प्रमाणात गावाकडे येत असून त्याची नोंद ठेवली जात आहे. ही माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून जागृक नागरिक या नात्याने संबंधितांनी ही माहिती द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!