नाशिक रेनेथॉनसाठी नोंदणी सुरू; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पहिले स्पर्धक

0
नाशिक : ऍक्टिव्ह एनर्जी अॅथलेटिक्सतर्फे सलग तिसऱ्या वर्षी ऍक्टिव्ह एनर्जी नाशिक रेनेथॉन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या पावसाळ्याचे दमदार स्वागत आणि फिटनेस रहावा या उद्देशाने 14 जुलै रोजी रेनेथॉनचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या नोंदणीची सुरुवात नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मा. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते नोंदणी फॉर्मचे अनावरण करून करण्यात आले. या प्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या रेनेथॉनची प्रथम नाव नोंदणी केली.
स्पर्धेच्या आयोजनाचे हे तिसरे वर्ष असून गेली दोन वर्षे ऍक्टिव्ह एनर्जी नाशिक रेनेथॉन या मॅरेथॉनला आपल्या शहर वासीयांचा उत्तम प्रतिसाद व प्रेम लाभले आहे. मागील वर्षी या स्पर्धेत सर्वच गटांतून 1800 हुन अधिक नाशिककरांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
एकूण तीन गटांत ही वेळेचे बंधन असणाऱ्या (Timed) स्पर्धा घेण्यात येणार असून 5 किमी, 10 किमी आणि 21.1 (अर्ध मॅरेथॉन) या अंतराच्या मुले/मुली, महिला आणि पुरुषांच्या विविध गटांत स्पर्धा होणार आहेत. स्पर्धा सर्वसामावेशाकल बनावी सर्वांना पावसात धावण्याचा नंद घेता यावा यासाठी 3 किमीची ‘फन रन’ चाही समावेश करण्यात आला आहे.
शहरातील धावपटूंच्या मागणीवरून या वर्षीपासून 21.1 किमी (अर्ध मॅरेथॉन) गटातही ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यंदा देखील स्पर्धकांना उच्च दर्जाचा अनुभव देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
या स्पर्धेचे नोंदणी अर्ज संजना अँपरेल, डिसुझा कॉलनी, निवेक स्पोर्टस क्लब, सातपूर आणि इतरत्र उपलब्ध करून देण्यात आले असून शनिवार ( दि 13) पासून www.activNRG.inया संकेतस्थळावर नोंदणी आणि ऑनलाईन शुल्क अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

*