विठोबाच्या पुण्यभूमीत, तनपुरे बाबांच्या वास्तूत पुरस्कार मिळाल्याने धन्य झालो : यशवंतराव गडाख

0
सोनई (प्रतिनिधी) – पंढरपूर या मोठ्या तीर्थक्षेत्रात विठोबाच्या पुण्यभूमीत व राष्ट्रसंत तनपुरे बाबांच्या वास्तू मठात मिळालेुा साहित्य पुरस्कार हा अनेक पुरस्कारापेक्षा वेगळा असून याचा मला मनापासून आनंद असून आजच्या पुरस्काराने मी धन्य झालो आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर जाहीर मनोदयात सांगितले.
वै. संत तनपुरे बाबा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य, कला, संस्कृती पुरस्कार ज्येष्ठ नेते व माजी खासदार यशवंतराव गडाख यांना पंढरपूर येथे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते संत, साहित्यिक, वारकरी यांच्या उपस्थितीत देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उल्हास दादा पवार होते. तर आमदार भारत भालके, माजी आमदार सुधाकर परिचारक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना बद्रीनाथ महाराज तनपुरे म्हणाले की, हा पुरस्कार देताना मला खूप आनंद वाटत आह, कारण माझे कॉलेजमधील आदर्श गडाख यांना पुरस्कार आम्ही देत आहोत. गडाख हे वारकरी संप्रदायाची कास धरणारे नेते आहे. त्यांनी नगरचे साहित्य संमेलन यशस्वी केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बाबतीत क्रांतिकारी झाले व गाजले गेले.
डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण यांची परंपरा यशवंतराव गडाख हे चालवत आहे. तनपुरे महाराज यांनी या पुण्यभूमित गडाखाना पुरस्कार दिला आहे. यशवंतराव गडाख यांनी राजकारण व सहकारात एक मोठी उंची गाठली आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण साहित्यिक हे माणसातले राजकारण सांगत असतात, परंतु गडाख यांनी साहित्यमध्ये काम करताना राजकारणातला माणूस त्यांनी सांगितला.
यशवंतराव गडाख म्हणाले की, विठोबाच्या भूमीत तनपुरे महाराजांच्या या पवित्र वास्तूमध्ये मला हा पुरस्कार मिळाला याचा मनापासून आनंद होत आहे. पांडुरंगाचे चरणी ऊर्जा, आत्मिक बळ व समाधान मिळत असते ते या ठिकाणाहून मी घेऊन जाणार आहे. तनपुरे महाराज व माझे कॉलेजचे शिक्षण बरोबर झाले. मी राजकारणात गेलो, पण बाबा अध्यात्माच्या चांगल्या क्षेत्रात गेले.
वै. तनपुरे महाराज यांनी 1972 च्या दुष्काळात अन्नछत्र चालू केले व छावण्याही उघडल्या. स्वतःच्या मतांसाठी, पक्षासाठी समाज विघटित करण्याचे काम काही लोकांकडून होते, पण समाजाला एक ठेवण्याचे काम साधू संत करत असतात म्हणून आपली संस्कृती टिकून आहे.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार उल्हास पवार यांनी यशवंतराव गडाख यांच्या अनेक आठवणीला उजाळा दिला.
या कार्यक्रमास प्रशांत परिचारक, प्रकाश पाटील, साहित्यिक दता भोसले, शारदाताई गडाख, शनी शिंगणापूर देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, संभाजी दहातोंडे, चंद्रहास शेटे, नानासाहेब तुवर, कडुबाल कर्डिले, भाऊसाहेब मोटे यांच्यासह अनेक मान्यवर व वारकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन अतुल महाराज आदमणे यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*