विभागीय साहित्य संमेलनाचे वाजले सूप

0

साहित्य गौरव पुरस्काराने यशवंतराव गडाख सन्मानीत
परदेशी, गोविलकर, दौंड यांना साहित्यरत्न 

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शांतिकुमारजी फिरोदिया फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा साहित्य गौरव पुरस्कार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना संमेलनाध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दोन दिवस सुरू असलेल्या या साहित्य मेजवाणीने साहित्यिक तसेच नगरकरांना तृप्त केले.
रविवारी सायंकाळी विभागीय साहित्य संमेलनाचा समारोप झाला. त्यापूर्वी हा पुरस्कार सोहळा झाला. यावेळी मसापच्या कोषाध्यक्ष सुनीता पवार, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, संयोजक जयंत येलूलकर यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.
टी.एन.परदेशी, लीला गोविलकर, कैलास दौंड यांना साहित्यातील योगदानाबद्दल साहित्यरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यानंतर समारोपाचा कार्यक्रम झाला. संमेलनाध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी आपली साहित्य, जिल्ह्यातील साहित्याचे योगदान, वाडमयीन प्रवाह आणि बदलत्या सामाजिक, राजकीय स्थितीवर परखड मत मांडले.
संमेलनात दुसर्‍या दिवशी सकाळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची मुलाखत झाली. त्यानंतर काव्य संमेलन रंगले. दुपारी तृतीयपंथीय साहित्यिक दिशाची मुलाखत झाली. सायंकाळी न्यू आर्टस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुरूषोत्तम करंडकविजेती माईक एकांकिका सादर केली.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या संमेलनात तब्बल 16 जिल्ह्यातील साहित्यिक आले होते. त्यांच्या चहापासून भोजन तसेच निवासाची व्यवस्था मसापच्या सावेडी शाखेच्या वतीने करण्यात आली होती. नेटक्या संयोजनाबद्दल आयोजकांना परजिल्ह्यातील साहित्यिकांनी धन्यवाद दिले. शेवटी आभार सदानंद भणगे यांनी मानले.

साहित्य संमेलनातून न रूजता वाचनसंस्कृती रुजण्यासाठी नव्याने काम हाती घ्यावी, अशी अपेक्षा नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केली.सावेडीत मंदिर पाडण्याची कारवाई चालू असताना याठिकाणी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सरस्वतीची मंदिर बांधण्यात येत होते, असे रामदास फुटाणे म्हणाले.

LEAVE A REPLY

*