खुशखबर : Redmi 6 सिरिज होणार लवकरच लाँच

0
नवी दिल्ली : शाओमीने भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे. कमीतकमी किंमतीत जास्तीतजास्त फीचर्स देणारी कंपनी म्हुणुन या मोबिल कडे ग्राहक आकर्षित होतात. रेडमीने नुकताच सब ब्रँड पोको लाँच केला. यानंतर या कंपनीने रेडमी सिरिजचे एकाचवेळी तीन फोन लाँच करून धमाका करणार आहे. शाओमी इंडियाचे भारतील प्रमुख मनू कुमार जैन यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

शाओमी ५ सप्टेंबरला रेडमी 6 (Redmi 6) ही सिरीज लाँच करणार आहे. सध्या बाजारात असलेल्या रेडमी 5 ची ही अपडेट असणार आहे. या तीन फोन पैकी Redmi 6 आणि 6A या दोन फोनना जुनमध्येच चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. तसेच रेडमी 6 प्रो वरचाही कंपनीने नुकताच पडदा उठविला आहे. कंपनीने ट्विटरवर पोस्ट केलेल्या इव्हेंटमध्ये मोठ्या आकड्यामध्ये 6 हा आकडा लिहिन्यात आला आहे. तर हा इव्हेंट 5 सप्टेंबरला आयोजित केला आहे.

LEAVE A REPLY

*