Friday, May 3, 2024
Homeजळगावगणानाम परिवारातर्फे विविध पक्ष्यांचे केले निरीक्षण

गणानाम परिवारातर्फे विविध पक्ष्यांचे केले निरीक्षण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासनाने 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा महाराष्ट्र पक्षी सप्ताह म्हणून घोषित केलेला आहे. त्या अनुषंगाने गणानाम परिवार जळगाव सदस्यांचा पक्षी निरीक्षण कार्यक्रम मेहरुण तलाव येथे 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते 8 या दरम्यान संपन्न झाला. गणानाम परिवारतर्फे पांढरा शराटीसह विविध पक्ष्यांचे निरीक्षण करुन नोंदी घेतल्या आहेत.

- Advertisement -

पक्षीनिरीक्षक गणेश सोनार, संदीप सोनार हे महाराष्ट्र पक्षी मित्र परिवाराचे सदस्य असून पंचवीस ते तीस वर्षापासून पक्षीनिरीक्षण करीत आहेत.

पक्षीनिरीक्षक सोनार बंधूंच्या मार्गदर्शनाखाली गणानाम परिवाराच्या सदस्यांनी बुधवारी मेहरुण तलाव परिसरात पक्षी निरीक्षण केले.

यात छोटे पाणकावळे, मोठया आकाराचा पाणकावळे, पाणडुबी, धिवर, मध्यम आकाराचे बगळे, कॉमन कूट, स्पॉटबिल डक, लाजरी पाणकोंबडी, जांभळी पाणकोंबडी, चक्रवाक बदक, सुर्यपक्षी, गायबगळे, अडई बदक, वंचक, छोटी तुतारी, कॉमन बझार्ड, कावळे, साळुंखी, भांगपाडी मैना, हुदहुद, पांढरा शराटी इत्यादी पक्षी दिसले.

पक्षीनिरीक्षक गणेश सोनार, संदीप सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली गणानाम परिवाराच्या सदस्यांनी बुधवारी मेहरुण तलाव परिसरात पक्षी निरीक्षण करुन विविध पक्ष्यांची नोंद केली.

या उपक्रमात चिन्मय बारुदवाले यांचे विशेष योगदान लाभले तर विजय सोनवणे, राकेश शिरसाठे, नव्या पाटील, आकांक्षा शिरसाठे, साक्षी शिरसाठे व श्री सोनवणे हे गणानाम परिवाराचे सदस्य निरीक्षणासाठी होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या