Type to search

Featured आवर्जून वाचाच नाशिक सेल्फी

अन जागल्या 1969च्या पूर स्मृती…

Share

नाशिक । गौरव परदेशी

गेादामाईला आलेल्या महापुराने तब्बल 50 वर्षानंतर नारो शंकराच्या घंटेला स्पर्श केला. त्या निम्मिताने नाशिकमधील जुणे जाणत्या लोकांच्या 1969च्या पुराची आठवण उजाळा मिळाला. तरुणाईने देखील हा ‘पूर’उत्सव साजरा करत हे क्षण सेल्फीत क्लिक केले.
1969चा महापूर पाहिलेले विश्वास गायधनी म्हणाले कि, 1969ला जो महापूर आला होता तेव्हा गोदावरीचे पात्र मोठे होते. आता मात्र, नदीपात्रात अतिक्रमण झाले असून पात्र अरुंद झाले आहे. गोदाकाठी ज्या नवीन इमारती बांधल्या गेल्या आहेत त्यामुळे पुराचे पाणी वाहण्यास मोठा अडथळा निर्माण होतो.

त्याचप्रमाणे 1970च्या काळात फक्त व्हिक्टोरिया पूल होता. आताच्या घडीला नदीवर लहान-मोठे 7 ते 8 पूल आहेत. त्यामुळे देखील पुराच्या पाण्यास अडथळा निर्माण होतो. कापडा पेठेतील बालाजीच्या मोठ्या कोटावरून खाली डोकावले असता छातीपर्यंत बांधकाम करून त्यावरती जाळ्या टाकण्यात आल्या आहेत. अनधिकृत बांधकामामुळे पुराचे पाणी थेट तिथल्या रहिवाशांच्या घरात शिरते.

दगड, मुरूम, खडी आणि काँक्रीटकरनामुळे उंची वाढून पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा कमी झाली आहे. त्यामुळे देखील पुराची तीव्रता वाढल्याचे जाणवते. 2016 साली आलेल्या महापुरात अरुंद पात्रामुळे गोदापार्क वाहून गेला होता. पुन्हा तशी परिस्थिती उद्भवण्याची भीती नाकारता येत नाही. ज्यावेळी गंगापूर धरण बांधण्यात आले होते त्यावेळी मी स्व:त तिथे होतो. गंगापूरवरून मल्हारखानपर्यंत ऐवढी दाट झाडी होती की, भरदुपारी 12 वाजेला देखील सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहचत नव्हती.

सध्याला अगदी विपरीत परिस्थिती पहावयास मिळते. या समस्येवर मात करायची असेल तर व्हिक्टोरिया पूलापासून टाळकुटेश्वर पूलापर्यंत नदी पात्रातील झरे मोकळे केले पाहिजे. त्यासाठी नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढले पाहिजे. जेणेकरुन पुराच्या पाण्याला खोली मिळेल व झरे मोकळे झाल्याने गोदावरी बाराही महिने प्रवाही राहिल.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!