काकडीचे चविष्ट थालीपीठ

0
काकडीचे थालीपीठ सध्या चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. अनेक कार्यक्रमांतून याबाबत बनवण्याची कला सांगितली जात आहे. आज आम्ही आपल्याला काकडीचे चविष्ट थालीपीठ कसे बनवावे याबाबत काही माहिती सांगणार आहोत. माहिती आवडली तर नक्की एकदा घरी करून बघाच.
लागणाऱ्या वस्तू : २ मोठ्या काकड्या, मीठ, तिखट, हळद, चिमुटभर ओवा, चमचाभर तीळ, धणेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिर्च्या, कणीक किंवा मिक्स्ड ग्रेन आटा, तेल.
कृती : आधी काकड्यांची सालं सोलून काकड्या (किसणीच्या मोठ्या छिद्रांमधून) किसून घ्यायच्या. साधारण ५ मिनिटं मोठ्या गाळणीवर ठेवून पाणी पडू द्या. कीस पिळू नका.

किसात आता पीठ सोडून, बाकी सगळे घटक घालून, हलक्या हातानं मिसळून घ्यायचे. यामिश्रणात, व्यवस्थीत घट्टं गोळा होईल इतपत पीठ घाला. तवा तापत ठेवा. २-३ मिनिटांत थालिपिठं लावून, तेल घालून, खरपूस भाजा.

वाढतांना : २ माणसांना एकवेळ पोटभर होतात.

इतर माहिती : मिश्रणात चमचाभर तांदळाचं पीठ घातलं तर थालिपिठं कुरकुरीत होतात. फार बियाळ काकड्या नकोत. यात पीठ पडणार आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार बर्‍यापैकी तिखट-मीठ घाला. थोडं गाजर किसून घातल्यास थालीपीठ अधिक दर्जेदार होते.

LEAVE A REPLY

*