Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मुख्याधिकार्‍यांची दमबाजी हवेत; टपरीधारकांचे पुन्हा अतिक्रमण

Share

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – शहरातील नवीन नगर रस्त्यावरील अतिक्रमणवरून शुक्रवारी मुख्याधिकार्‍यांनी टपरीधारकांंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. टपरीधारकांनी या इशार्‍याला जुमानले नाही. शनिवारी नविन नगर रस्त्यावर पुन्हा हातगाडी व टपरीधारकांनी अतिक्रमण केले आहे.
नवीन नगर रोड परिसरात छोट्या व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. चहाच्या टपर्‍या, फळ विक्रेते व इतर छोट्या व्यावसायिकांनी या रस्त्याच्या कडेला आपला व्यवसाय थाटल्याने वाहतुकीचा नेहमी खोळंबा होत असतो.

या रस्त्यावर हॉस्पिटल, बँका, शासकीय कार्यालय असल्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. टपरीधारकांच्या अतिक्रमणामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. नवीन नगर रस्ता अतिक्रमण मुक्त करावा अशी नागरिकांनी वारंवार मागणी केली आहे. नगरपालिकेनेही हे अतिक्रमण अनेक वेळा हटविले आहे. मात्र टपरीधारक पुन्हा अतिक्रमण करत असतात. शुक्रवारी सकाळी अतिक्रमण हटाव पथक नवीन नगर रस्त्यावर अतिक्रमण काढण्यासाठी आले असता भयभीत झालेल्या टपरीधारकांनी स्वतःहून अतिक्रमण हटविण्याबाबत या पथकाला सांगितले. यानंतर सर्व टपरीधारक टपर्‍यांसह नगरपालिकेत गेले.

यावेळी मुख्याधिकारी संतप्त झाले होते. टपर्‍या तोडण्याचा इशारा देऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला होता. यानंतर टपरीधारक अतिक्रमण करणार नाही असे वाटत असतानाच काल नवीन नगर रस्त्यावर टपरीधारकांनी पुन्हा अतिक्रमण केले. नगरपालिका प्रशासनाचा अतिक्रमण करणार्‍यांवर कुठलाही दबाव नसल्याने शहरात पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने अतिक्रमण करणार्‍याविरुद्ध कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!