Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रिझर्व्ह बँकेचे पीएमसी बँकेवर निर्बंध; १ हजार रुपयेच काढता येतील; नाशिकच्या शाखेत बँक अधिकाऱ्यांना घेराव

Share

नाशिक | प्रतिनिधी

शरणपूर रोडवरील पीएमसी बँकेच्या शाखेत खातेधारकांची गर्दी झाली आहे. बँक अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे देण्यात येत नसल्याने खातेधारक संतप्त झाले असून बँकेत सकाळपासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. खातेधारकांनी पीएमसी बँकेच्या व्यवस्थापिकेला घेराव घातला असून पैसे मिळावेत अशी मागणी केली जात आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यानुसार बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तर खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतील अशा बातम्या आज सकाळपासून सुरु होत्या. त्यामुळे पीएमसी बँकेच्या नाशिकमधील खातेधारकांनी आज सकाळपासून मोठी गर्दी बँकेच्या आवारात जमली आहे.

नाशिकच्या पीएमसी बँकेत खातेधारकांची मोठी गर्दी

शरणपूर रोडवरील पीएमसी बँकेच्या शाखेत खातेधारकांची गर्दी झाली आहे. बँक अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे देण्यात येत नसल्याने खातेधारक संतप्त झाले असून बँकेत सकाळपासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. खातेधारकांनी पीएमसी बँकेच्या व्यवस्थापिकेला घेराव घातला असून पैसे मिळावेत अशी मागणी केली जात आहे.

Deshdoot यांनी वर पोस्ट केले मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

बँकेची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आदेशात म्हटले आहे. या आर्थिक निर्बंधांचा आदेशानुसार २३ सप्टेंबर पासून बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नये असेही आदेशात म्हटले आहे.

बंकेवरचे हे निर्बंध सहा महिन्यासाठी लागू असतील व त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल. या निर्बंधांची माहिती बँकेने प्रत्येक ठेवीदाराला देणे बंधनकारक असल्याचे रिझर्व बँकेने सांगितल्यानंतरदेखील नाशिकमध्ये अद्याप बँकेच्या अधिकारी वा कर्मचार्यांनी याबाबत माहिती दिलेली दिसून आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!