Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

वादावर पडदा : उर्जित पटेलांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Share

नवी दिल्ली – केंद्र सरकार आणि आरबीआयमधील वाद लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची भेट घेतली होती, तसेच या भेटीत दोघांचेही एका फॉर्म्युल्यावर एकमत झाले आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

या फॉर्म्युल्यानुसार केंद्र सरकार आरबीआयकडून पैसे मागण्यासंदर्भात नरमाईची भूमिका घेणार आहे, तर आरबीआयही केंद्राला कर्ज देण्यात थोडी सूट देणार आहे. या फॉर्म्युल्यांतर्गत आरबीआय काही बँकांनी करेक्टिव एक्शन (पीसीए) फ्रेमवर्कमधून बाहेर काढणार आहे. जेणेकरून बँक अधिक कर्ज देऊ शकेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्जित पटेल हे शुक्रवारी दिल्लीत होते. त्यांनी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यातील एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. केंद्र व रिझर्व्ह बँकेतील संघर्षानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट झाली. या भेटीमुळे केंद्र व रिझर्व्ह बँकेतील तणाव कमी होण्याची चिन्हे आहेत. मतभेद असले तरी दोन्ही बाजूंनी चर्चा करणे हे महत्त्वाचे आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान; केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर निशाणा साधला होता. २००८ ते २०१४ दरम्यान, बँकांकडून झालेल्या अनिर्बंध कर्जवाटपाला नियंत्रित करण्यात मध्यवर्ती बँकेची भूमिका अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!