Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

दिव्यांगांना नोटा ओळखण्यासाठी ‘हे’ अॅप ठरेल उपयुक्त

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

रिजर्व बँक ऑफ इंडिया दिव्यांग व्यक्तींना भारतीय चलन ओळखता यासाठी नवे मोबाईल अॅप  आणण्याच्या तयारीत आहे. या अॅपमधून नोटेचा फोटो काढून  अॅपमधून नोट किती रुपयांची आहे याबाबत सांगितले जाणार आहे.

भारतीय चलनात सध्या १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत. यातील १०० रुपयांपुढील नोटा इंटॅग्लिओ प्रणालीवर छापण्यात येत असून यावरील विशिष्ट खुणेमुळे या प्रकारच्या नोटा दिव्यांग व्यक्तींना ओळखता येतात.

मात्र दिव्यांगांना सहजपणे नोटा ओळखता याव्यात यासाठी हे अॅप विकसित केले जाणार आहे.  या अॅपच्या माध्यमातून नव्या व जुन्या नोटा दोन्ही प्रकारच्या नोटा ओळखता येतील.

असे वापरा अॅप

हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर अॅप ओपन करून मोबाइलच्या कॅमेरासमोर संबंधित नोट धरावी लागेल. तिचा फोटो य्गोया निघाल्यानंतर अॅप युजरला सूचना दिली जाईल व त्यात संबंधित नोट किती रुपयांची आहे हे सांगितले जाईल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!