Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

येत्या 30 ऑक्टोबरला आरबीआय जाहीर करणार महत्वपूर्ण निर्णय

Share

मुंबई | वृत्तसंस्था

कर्ज थकीत घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँके संबंधी रिझर्व्ह बँक (आरबीआय) येत्या 30 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर कऱणार आहे. आरबीआयने आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या पीएमसी खातेधारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आहे.

यावेळी त्यांनी 30 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले. पीएमसी खातेधारक गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. आज पीएमसी खातेदारकांची आरबीआयच्या अधिकाऱ्यां सोबत बैठक निष्पन्न झाली.

यावेळी आरबीआयने सध्या आचारसंहिता लागू असल्याने निर्णय घेणे शक्य नसल्याचे सांगितले असल्याची माहिती एका खातेधारकाने दिली आहे. तसेच आरबीआयने 25 आणि 27 ऑक्टोबरला पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असे सांगितलं आहे. यावेळी आरबीआयने 30 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करु असेही आश्वासन दिले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!