Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

खुशखबर : EMI होणार कमी; रेपो रेट सलग चौथ्यांदा घटला

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था 

केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर कर्जाचा ईएमआय कमी होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. दरम्यान, वर्षांत सलग चौथ्यांदा रिजर्व बँकेने रेपो दरात कपात केली आहे. यामुळे वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज स्वस्त होणार आहेत. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दरात 0.35 टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयामुळे गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होणार आहेत.

आरबीआयच्या सहा सदस्यीय वित्तीय धोरण समितीने (MPC) आज रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर रेपो दर 5.40 टक्के इतका झाला आहे. तर, रिव्हर्स रेपो दर 5.15 टक्के इतका करण्यात आला आहे.

रेपो दर 5.75 टक्के होता. जो सप्टेंबर 2010 नंतरचा सर्वात कमी दर होता. त्यानंतर आरबीआयने तीन वेळा रेपो दर 0.75टक्के केला. या कपातीचा लाभ बँका आपल्या ग्राहकांनी देतील जेणेकरुन गृह, वाहन आदी कर्जे स्वस्त होतील व मासिक हप्ते कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!