Type to search

Breaking News देश विदेश मार्केट बझ मुख्य बातम्या

लवकरच बाजारात २० रुपयांची नवी नोट येणार

Share

मुंबई : १०० ची नोट चलनात आल्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच २० रुपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. आरबीआयच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. दोनशे, दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणल्यानंतर आरबीआयनं याआधीच १०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या वेगवेगळ्या रंगातील नोटा चलनात आणल्या आहेत.

नुकतेच १०० रुपयांचे नाणे प्रसारित करण्यात आले असताना आता २० रुपयांची नवी नोट बाजारात येणार आहे. २०१६ पासून नव्या रचनेच्या नोटा अंमलात आणल्या होत्या.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०१६ पर्यंत २० रुपयांच्या नोटांची संख्या ४.९२ अब्ज इतकी होती. मार्च २०१८ पर्यंत ती १० अब्ज झाली. ही संख्या चलनातील एकूण नोटांच्या ९.८ टक्के इतकी आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!