अभिनेत्री रवीना टंडनविरुद्ध गुन्हा

0

भुवनेश्वर : बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरमध्ये छाया चित्रीकारणास परवानगी नसताना देखील रविना टंडन यांनी चित्रीकरण केल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केला आहे. ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमधील श्री लिंगराज मंदिर प्रशासनाच्या तक्रारीनंतर रवीनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरु केला आहे.

रविवारी दिवशी दुपारच्या वेळेस रवीना टंडन भुवनेश्वरच्या लिंगराज मंदिरात जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी आली होती. इथे कॅमेरा निषिद्ध क्षेत्रात तिने चित्रीकरण केलं.सोशल मीडियावर रवीना टंडनचा मंदिरामध्ये चित्रीत झालेला व्हिडीओ समोर आल्यानंतर, लिंगराज मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थापकांनी तिच्याविरोधात जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

चित्रीकरण करण्यासाठी रवीनाने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केला आहे. केवळ मंदिरातील कर्मचाऱ्यांना मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी आहे, असंही प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. हे कृत्य सुरक्षा आणि नियमांचं उल्लंघन आहे. या घटनेने भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनेही प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

*