AsianGames : भारताला शूटिंगमध्ये पहिले कांस्यपदक

0
जकार्ता : आशियाई क्रिडा स्पर्धेला इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरुवात झाली आहे. १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पहिल्याच दिवशी भारतीय नेमबाजपटूंनी पदकाची कमाई केली आहे. १० मी. एअर रायफल सांघिक प्रकारात भारताच्या अपुर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने कांस्य पदकाची कमाई केली. अंतिम फेरीत कोरिया, मंगोलिया यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांची कडवी झुंज मोडून काढत भारतीय जोडीने कांस्यपदकाची कमाई केली आहे.

सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये भारतीय जोडीने या स्पर्धेत आपला दुसरा क्रमांक राखून ठेवला होता. मात्र चीनच्या जोडीने धमाकेदार पुनरागमन करत भारतीय जोडीला तिसऱ्या स्थानावर ढकललं. अखेरच्या क्षणांमध्ये चीनची झुंज मोडून काढण्यात भारतीय जोडी काही गुणांनी मागे पडली. यंदाच्या एशियाडमधलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे.

LEAVE A REPLY

*