Type to search

Breaking News जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

रावेर : मतदानाकरिता मतदान केंद्रावर रांगा

Share

रावेर | प्रतिनिधी –

लोकशाहीचा उत्सव, लोकउत्सव म्हणून यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे पहिले जात आहे.सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरु असून, सुरवातीला ८ मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅॅट मध्ये तांत्रिक अडचणी आल्याने ते बदलवून मतदान सुरु झाले,दुपारी १ वाजेपर्यंत ९४ हजार ८८१ मतदान झाल्याने ३२.३७ टक्के मतदानाचा पल्ला गाठला गेला.

दरम्यान,निवडणुकीच्या रिंगणात असलेले कॉंग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांनी सकाळी ७.१५ मिनिटांनी त्यांच्या पत्नी डॉ अरुणा,मुलगी स्नेह, यज्ञा, मुलगा धनंजय यांच्या समवेत, खिरोदा येथील गांधी पुतळ्याजवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र क्रमांक १६९ मध्ये मतदानाचा हक्क बजावला.

भाजपचे हरिभाऊ जावळे यांनी भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील बूथ क्रमांक २३८ यावर,पत्नी कल्पना, सून जयश्री समवेत मतदानाचा हक्क बजावला, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी त्यांच्या परिवारास यशवंत विद्यालयात मतदान करून मतदानाचा हक्क पावणे तीन वाजेला बजावला, तर रावेर येथील यशवंत विद्यालयात सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते.या केंद्राचे केंद्राध्यक्ष क्रांती नाईक, मतदान अधिकारी क्र.१ गजाला अली,मतदान अधिकारी क्र.२ आफरीन तडवी, मतदान अधिकारी क्र.३ लीना महाजन,यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.

सकाळी ९ वाजेपर्यंत ६.७८ टक्के मतदान झाले होते,११ वाजता १८.१९,तर एक वाजेपर्यंत ३२.३७ टक्के मतदान झाले आहे. हि संख्या ९४ हजार ८८१ इतकी आहे. मतदान सुरळीत असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे,या निवडणुकीत झारखंड, गोवा, गुजरात, मुंबई या ठिकाणाहून पोलीस कुमुक मागवण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!