Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

रावेर : केऱ्हाळा येथील दोघं महिलांच्या हत्येप्रकरणी दोन संशयीत ताब्यात

Share

रावेर (प्रतिनिधी) –

तालुक्यातील केऱ्हाळे खुर्द येथील नसिबा तडवी व शालुबाई तायडे या दोन महिलांचा दगडाने व धारदार शस्त्राच्या सहाय्याने खून झाल्याची घटना काल दि.१९ रोजी घडली. एकाच दिवशी, एकाच ठिकाणी दोन महिलांची निर्घुण हत्या झाल्याच्या घटनेने जिल्हा हादरला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षकांसह सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली, आणि गुन्हा दाखल होताच काही तासातच दोन संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

संजय गौतम तायडे रा.केऱ्हाळे खु. यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, विभागीय पो.अ. पिंगळे, स्था.गु.शाखेचे पी.आय.श्री. रोहम यांनी घटनास्थळी भेट दिली व डीवायएसपींसह श्री.रोहोम व रावेर पोलीस यांनी अखेर दोन्ही महिलांच्या हत्येतील दोन संशयतांना ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपींमध्ये १) कैलास गणू गाडे (वय ५७) रा.केऱ्हाळे, २) लक्ष्मण किसन निकम (वय ६०) रा.केऱ्हाळे यांना ताब्यात घेतले आहे. संशयीत म्हणून ताब्यात घेतलेले आरोपी महिलांचा घून झाल्याच्या नंतर ते नागरीकांसोबत शोधण्यात सुध्दा सहभागी होते अशी माहिती समोर येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!