खडसे बदनामीप्रकरणी अंजली दमानिया अडचणीत; सांताक्रुझ पोलिसांना पकड वॉरंटचे आदेश

0
जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करुन बदनामी करणाऱ्या मुंबईस्थित समाजसेविका अंजली दमानिया यांच्या विरोधात रावेर न्यायालयाने आज पकड वॉरंट जारी केले आहे.

हे वॉरंट पाकिटातून बजावण्यात येणार असून दमानिया जेथे असतील तेथे त्यांना केव्हाही अटक होऊ शकते. रावेर न्यायालयाचे न्यायाधीश डी. जी. मालविय यांनी याबाबत निर्णय दिला असून एकनाथ खडसे यांच्या वकिलाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

खडसे यांच्या जावयाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाच प्रकरण आदी विषयांवर बेछूट आरोप अंजली दमानिया यांनी जळगावात येवून केल्याबद्दल भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी खडसेंची बदनामी केल्याचा खटला (क्रमांक 416) कलम (500 व 501) नुसार भरला होता.

त्यानंतर खटल्याचे रितसर समन्स प्राप्त होवूनही अंजली दमानिया कोर्टात हजर होत नव्हत्या. म्हणून आज अखेर त्यांच्या विरोधात न्यायाधिशांनी पकड वॉरंट काढले.

या खटल्यात फिर्यादीतर्फे ॲड. चंद्रजित पाटील व ॲड. तुषार माळी काम पाहत असून त्यांनीच देशदूतशी बोलताना वरील माहिती दिली.

LEAVE A REPLY

*