Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

रावेर येथे २९ लाख रुपयांची रोकड जप्त

Share

रावेर । विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या वाहन तपासणीत चोरवड (ता.रावेर) येथील सीमा तपासणी नाक्यावर मध्य प्रदेशच्या बसमधील प्रवाशाजवळ 29 लाख 15 हजार रुपयांची रोकड मिळाली. याप्रकरणी आता आयकर विभागाचे अधिकारी कसून चौकशी करत आहे. ही रक्कम हवाल्याची असल्याचा संशय आहे. नंदुरबारातही 13 लाख जप्त केले. खान्देशात दोन ठिकाणी मिळून 42 लाखांची रक्कम जप्त केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग, बॉर्डर चेक पोस्ट पथकांकडून चोरवड चेक पोस्टवर वाहनांची तपासणी होत आहे. बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बर्‍हाणपूरकडून आलेल्या मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बस (एम.पी.09, एफए-3275) मध्ये असलेल्या मोहंमद शहजाद यांच्याकडे 29 लाख 15 हजारांची रोकड मिळाली. मो. शहजाद खंडवा येथील अस्थिमार्ग येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली.

त्याला चेक पोस्टवर तपासणी करणारे स्थिर पथक, राज्य उत्पादन शुल्क व बॉर्डर चेक पोस्ट पथकाचे एस.आर.गायकवाड, एन.आर.तडवी, कॉन्स्टेबल व्ही.डी. भोळे, उत्पादन शुल्क विभागाचे नंदू नन्नवरे, गिरीश पाटील, व्हिडिओ चित्रण करणारे मनोज पाटील यांनी ताब्यात घेऊन निवडणूक विभागाचे व आयकर विभागाच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द केले. ही रक्कम जप्त करून भरारी पथकप्रमुख डी.व्ही.ओतारी यांच्या ताब्यात दिली आहे. ती रोकड खंडवा येथील व्यापार्‍याने भुसावळ येथील आसारी विक्रेत्याला पाठवली असल्याचे त्याने अधिकार्‍याला सांगितले, तर ही रक्कम हवाला व्यवहाराची असल्याचा संशय आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!