केळी भावात पाच वर्षात मोठी घसरण

केळी भावात पाच वर्षात मोठी घसरण

देशात कोरोनाच्या धोक्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे,त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी होत असताना,शेतमालाचे  भाव गडगडकल्याने शेतकरी सुद्धा बिकट परिस्थितीचा सामना करत आहे.

यासाठी सरकार आणि केळी उत्पादक संस्था,संघटना यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे,केळी भावाने पाच वर्षांतील निच्चांकी गाठल्याने.८-१० रुपये डझन ने होणारी केळी मागणी उत्पादन खर्चापेक्षा कमी झाल्याने, केळीला आधारभूत किंमत मिळावी अशी मागणी सध्या केळी उत्पादक करत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २२ मार्च पासून लॉकडाऊन झाल्याने,केळी नाशवंत शेतमाल असल्याने लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाठपुराव्याने केळी निर्यात सुरू झाली, मात्र केळीला बोर्ड भावापेक्षा निम्म्याने ३००/५०० प्रति किंटल खरेदी होत असतांना,यात उत्पादन खर्च सरासरी सहा रुपये प्रति किलो आहे.अडीच किलोसाठी १५ रुपये खर्च झाला आहे.

दिल्ली,राज्यस्थान,पंजाब,हरियाणा,जम्मू/काश्मीर,पुणे, मुंबईमध्ये ६०-७० रुपये डझनप्रमाणे २५ रुपये किलोने विक्री स्थानिक व्यापारी करत आहे.शेतकऱ्यांच्या हाती ८-१० रुपये किलो ने पैसे पडत असल्याने,केळी उत्पादक व व्यापारी यांच्यातील विषशमतेची दरी वाढली आहे.

यासाठी अशा कठीण काळात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे ही मागणी ऐनपूर येथील केळी उत्पादक विकास महाजन यांनी केली आहे. यासाठी आमदार शिरीष चौधरी,अखिल भारतीय केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी उभयतांकडे मांडले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com