Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

‘भीम आर्मी’चे नेते रावण यांची तुरुंगातून सुटका

Share

सहारनपूर : अखेर रावणाची सुटका झाली असून जेलमधून बाहेर येताच त्याने आपण भाजपचा असा पराभव करू की ते सत्तेतच काय विरोधातही दिसणार नाही असे विधान केले आहे. भीम आर्मी नावाची संघटना उभी करणाऱ्या चंद्रशेखर आझाद उर्फ रावणची सहारनपूर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. २०१७ साली जातीय दंगल भडकवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर येताच रावण यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी होण्याच्या भीतीनेच आपली सुटका करण्यात आल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.

२०१७ मध्ये सहारनपूर येथे दंगल झाली होती. त्यामुळे रावण यांना अटक करण्यात आली होती. मात्र तब्बल १६ महिन्यानंतर गुरुवारी रात्री २ वाजून ३० मिनिटांनी त्यांची सुटका करण्यात आली. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. रावण यांच्या सुटकेची खबर मिळताच भीम आर्मीचे शेकडो कार्यकर्ते तुरुंगाबाहेर जमले होते. रावण यांना कडेकोट बंदोबस्तात पोलिसांच्या जीपमधून बाहेर काढण्यात आले.

रावण यांच्या अटकेचा निषेध करत सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. तुरुंगातून बाहेर येताच रावण यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करायचे आहे. २०१९ मध्ये भाजप सत्तेतच नव्हे तर विरोधी पक्षातही बसता कामा नये. भाजपच्या गुंडाशी आता दोन हात करावे लागतील, त्यासाठी सामाजिक ऐक्य व्हायला हवे’, असं आवाहनही त्यांनी केलं.

चंद्रशेखर आझाद याला आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने जिग्नेश मेवाणीद्वारे बरेच प्रयत्न केले आहेत. उत्तर प्रदेशातील महाआघाडीमध्येही त्याला आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आहे. काँग्रेसला यात यश मिळू नये म्हणून भाजपने चंद्रशेखर आझादची सुटका केल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली होती. ११ महिने त्याला तुरुंगात ठेवता येणं शक्य होतं, मात्र ९ महिन्यानंतर त्याला केंद्र सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!