Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

रत्नागिरीतील तिवरे धरण फुटले; 25 बेपत्ता, तिघांचे मृतदेह हाती

Share

रत्नागिरी l वृत्तसंस्था

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळील तिवरे धरण फुटल्याने 25 जण बेपत्ता झाले आहेत. तिघांचे मृतदेह हाती लागले असल्याची माहिती मिळते आहे.

रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक नागरिक आणि तलाठ्यांनी याबाबत सावधानतेचा इशारा दिल्यानंतर अनेक गावातील नागरिक इतरत्र हलले मात्र अद्यापही 25 पेक्षा अधिक जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी एन डी आर एफ च्या टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. धरण फुटल्याने 12 गावांना फटका बसला आहे.

पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!