Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रबंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात; १७ जखमी

बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात; १७ जखमी

रत्नागिरी | Ratnagiri

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण (Barsu Refinery Survey) आजपासून पुन्हा सुरू होणार आहे.

- Advertisement -

या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सतर्क असताना रिफायनरीचे सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात १७ पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

धक्कादायक! ६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्‍लिल चाळे

कशेडी गावाजवळ पोलीस गाडीला अपघात झाला आहे. अपघातातील जखमी पोलिसांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पोलिसांच्या प्रकृतीबाबत अद्याप नेमकी माहिती समजू शकलेली नाही.

‘तो’ बिबट्याचा हल्ला नाही, तर हत्या; बोटा परिसरातील प्रकरणाला वेगळं वळण

बारसू, सोलगावसह आसपासच्या परिसरात जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. रिफायनरी विरोधकांच्या प्रमुख नेत्यांना तालुका बंदी करण्यात आली आहे. गावागावातील काही प्रमुख घरांवर पोलिसांनी नोटीस लावल्या आहेत.

MPSC संयुक्त परीक्षेचे ९० हजारांपेक्षा जास्त हॉल तिकीट Telegram वर लीक… आयोगाचे काय स्पष्टीकरण ?

तर दुसरीकडे कोकणातील रिफायनरी विरोधक आंदोलनावर ठाम आहेत. बारसू आणि सोलगावच्या परिसरात आज पोलिसांचा रूट मार्च काढण्यात येणार आहे. गावागावातील ठिकठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या