893 दुकानात रेशनचा माल पोहचलाच नाही ; रेशनदुकानदार आजपासून संपावर!

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑगस्ट महिना सुरु झाला तरी जिल्ह्यातील 893 रेशन दुकानात अद्याप धान्यच पोहचलेच नसल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून प्राप्त माहितीवरुन उघड झाले आहेे.
जिल्ह्यात 1836 दुकानापैकी 941 ठिकाणी माल दोन दिवसापूर्वी माल पोहचला असताच आता दुकानदार आजपासून संपावर जाणार असल्याने त्या लाभार्थीयांना धान्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. नियोजनाअभावी अगोदरच अपयशी ठरलेल्या जिल्हा पुवरठा विभागाला ऑगस्ट महिना सुरु झाला असतानांही जुलै महिन्यातील माल लाभार्थीयांच्या हाती देता आला नाही. यापूर्वी जून महिन्यात धान्य वाटप करण्यात आले होते. प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेनंतर रेशन दूकानातून लाभार्थीयांना राशनचे वाटप होणे अपेक्षित असते.

मात्र, यंदा हमालांच्या बंदमुळे उशिर झाला. यावर काही तरी, मार्ग काढणे अपेक्षित असतांना पुरवठा विभागाने सुरवातीला गांभिर्याने घेतले नाही. जिल्ह्यात 1 हजार 836 रेशन दुकाने आहेत. त्यापैकी 31 जुलै अखेर 941 दुकानात धान्य पोहच झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त आहे.धान्य वाटप केलेल्या स्वस्त धान्य दुकानांची तालुकानिहाय संख्या (एकूण संख्या): अकोले- 90 (138), संगमनेर- 14 (163), 18 (81), कोपरगाव-45 (114), श्रीरामपूर- 73 (111), राहुरी- 65 (108), नेवासा- 10 (151), पाथर्डी-110 (153),पारनेर- 16 (120), श्रीगोंदा- 124 (70), कर्जत- 31 (135), जामखेड- 60 (103) आदी. तर, नगरशहरासह (91) नगर तालुका व शेवगाव तालुक्यातील एकूण प्रत्येकी 124 दुकानात माल पोहच झाला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.

 संबधित ठेकेदाराला नोटिस – 
जुलै महिन्यातील धान्य वितरण करण्यास उशिर झाला.त्यामूळे लाभार्थी अद्याप वंचित आहेत.दरम्यान धान्य पोहच करण्यात विलंब का झाला.या बाबत संबधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटिस बजाविण्ंयात आली आहे. अन्न सुरक्षा विधायक 2013 नूसार लाभार्थीयांना वंचित ठेवल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होवू शकतो. अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.

 संपाची हाक कायम! – 
विविध मागण्यासर्ंभात आज 1 ऑगस्ट रोजीपासून संपावर जाणार असल्ंयाचा ईशारा रेशन दुकानदारांनी दिला आहे.त्यानूसार 31 जुलै अखेरपर्यत राहुरी, अकोले, संगमनेर व नगर शहरातील रेशन दूकानदार संघटनेने संपावर जाणार असल्याबाबत निवेदन दिले आहे.जिल्हा पुरवठा विभागाकडून दुकानदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरु केला जाणार असला तरी, संघटना ऐकून घेणार का? हा महत्वाचा प्रश्‍न आहे.

LEAVE A REPLY

*