रेशनवर एक किलोच्या पॅकिंगमध्ये मिळणार तूर डाळ

0

राज्य सरकारचे आदेश : रेशनदारांचे मार्जिन निश्‍चित

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने रेशन दुकानावर विक्री होणार्‍या विक्रीची कार्यपध्दती निश्‍चित केली आहे. यात आता रेशनवर 55 रुपये किलो प्रमाणे एक किलोच्या पॅकिंगमध्ये तूर दाळ मिळणार आहे. यासह सरकारने ही विक्री प्रक्रिया पार पाडणार्‍या रेशन दुकानदारांचे मार्जिन निश्‍चित केले आहे.

राज्य सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेत शेतकर्‍यांकडून तुरीची भरडाई खरेदी केली आहे. आता या भरडाईतून तयार होणार्‍या तूर दाळीची रेशन दुकानावर विक्री करण्यात येणार आहे. मुंबई जवळील सानपाडा येथील शासकीय गोदामातून ही तूर दाळ पणन महामंडळामार्फत त्या-त्या जिल्ह्यांना वितरित होणार आहे.

जिल्हा मार्केटींग अधिकारी आणि राज्य पणन महासंघ मर्यादीत यांनी त्या-त्या जिल्ह्याच्या मागणीनुसार एक किलोच्या पाकीटात पॅकिंग करून तूर दाळीच्या 25 पाकिटांची 1 बॅग तयार करून त्या रेशन दुकानावर विक्रीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

55 रुपये प्रति किलोने विक्री होणार्‍या तूर दाळीच्या प्रत्येक किलो मागे पॉस मशिनव्दारे विक्री करणार्‍या दुकानदारांना 1 रुपये 50 पैसे तर मशिनशिवाय विक्री करणार्‍या दुकानदारांना प्रती किलो 70 पैसे प्रमाणे मार्जिंन देण्यात येणार असल्याचे सरकारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

 

LEAVE A REPLY

*