अन्न दिन व अन्न सप्ताहाच्या निर्देशानुसार दर महिन्याच्या सात तारेखपूर्वी धान्य वितरण पूर्ण होणार

0

इपीडीएसची माहिती पूर्ण करण्याचे आवाहन

भोकर (वार्ताहर) –  अगदी शेवटच्या घटकापर्यंत धान्य लवकरात लवकर पोहचविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी रेशनकार्डधारक व स्वस्त धान्य दुकानदार या दोघांनी आता महिना अखेरीची वाट पाहू नका कारण यापुढे दर महिन्याच्या सात तारखेपूर्वीच सर्व वितरण पूर्ण करायचे आहे. व पुढील महिन्याचे चलन ही दुकानदारांनी अगोदरच्या महिन्याच्या 25 तारखेलाच भरणा करावयाचा आहे. त्यासाठी शासन बदलतयं, तुम्ही ही बदला असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचीत यांनी केले.
श्रीरामपूर तहसील कार्यालयात नुकत्याच झालेल्या तालुक्यातील धान्य दुकानदारांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी जितेंद्र इंगळे, तहसीलदार सुभाष दळवी, जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी सुभाष कदम, पुरवठा अव्वल कारकून शिवाजी वायदंडे, शारदा वाघ, काकासाहेब मते, देवीदास देसाई, बजरंग दरंदले, शिवशंकर श्रीनाथ आदी उपस्थित होते.
शासनस्तरावर सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अमुलाग्र बदल होत आहेत. त्याचाच भाग म्हणजेच या प्रणालीचे संगणकीकरण, वितरण प्रणालीत बायोमेट्रीक पद्धती हे आहेत. आपण सर्वांनी हे बदल स्वीकारले आहेत. त्यानुसार आता सर्वांनीच स्वत:मध्ये बदल करून घ्यायचे आहेत. त्यात आता धान्य दुकानदारांनी पुढील महिन्याच्या धान्यासाठी चालू महिन्याच्या 25 तारखेलाच चलन भरणा करायचा आहे.
शासनाने घोषित केलेल्या ‘अन्न दिन’ व ‘अन्न सप्ताह’ या निर्देशानुसार दुकानदारांनी रेशनकार्डधारकांना दरमहिन्याच्या 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत धान्य शेवटच्या घटकापर्यंत पोहचवायचे आहे. त्यादृष्टीने हे बदल करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे शासनही दुकानदारांना दरमहिन्याच्या एक किंवा दोन तारखेपूर्वीच दुकानात धान्य पोहच करणार असून लागलीच धान्य वितरण सुरू करायचे आहे.
त्यामुळे आता रेशन रेशनकार्ड धारकांनी ही महिना अखेरीची वाट न बघता आपले धान्य विस तारखेपुर्वीच उचल करायचे आहे. त्यानंतर दुकानदाराने मशीनवरील विक्री बंद केल्यानंतर कुणालाही धान्य दिले जाणार नाही याची सर्व कार्डधारकांनी दक्षता घ्यावी. शिवाय सर्व धान्य हे आता बायोमेट्रीक पद्धतीने म्हणजेच पी.ओ.एस. मशीनद्वारेच वितरण करायचे आहे.
या मशिनद्वारे वितरण केलेल्या धान्यालाच वाढीव मार्जीन मिळणार आहे. जे दुकानदार मशीनद्वारे वितरण करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. ज्या कार्डधारकांची आधारसह इतर कुठलीही माहिती अपूर्ण असल्यास त्यांनी ती तातडीने स्वस्त धान्य दुकानदारांकडे पोहच करावयाची आहे.
सर्व धान्य दुकानदारांनी ‘ई.पी.डी.एस.’साठीची अचूक माहिती संगणकामध्ये भरायची आहे. त्यासाठी रेशनकार्ड धारकांनीही आपली माहिती अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यायची आहे. कारण काही व्यक्तीच्या बाबतीत आधार क्रमांक असूनही व्हेरीफीकेशनसाठी अडचणी येत आहेत. अशा व्यक्तीनी आपले आधार कार्ड पडताळणी करून घ्यावेत.
यापुढे ज्यांचे आधार बायोमेट्रीक मशीनमध्ये व्हेरीफीकेशन होईल त्यांनाच धान्य मिळणार आहे. त्यामुळे बदलत्या काळाचा ओघ बघून सर्वांनीच स्वत:मध्ये बदल करून घ्या असे आवाहन यावेळी निचीत यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी मशीनद्वारे धान्य वितरणात येत असलेल्या अडचणी मांडल्या. यावेळी झालेल्या चर्चेत बजरंग दरंदले, रज्जाक पठाण, चंद्रकांत झुरंगे, नाना लीहिणार, गोपीनाथ शिंदे आदींसह अनेकांनी सहभाग नोंदविला.
यावेळी तालुक्यात मशीनद्वारे सर्वात जास्त धान्य वितरण करणारे बबनराव गवारे, नरेंद्र खरात व कैलास राशिनकर यांचा सत्कार जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, सुरेश मैड, शहराध्यक्ष माणीक जाधव, भाऊसाहेब वाघमारे,
दिलीप गायके, चंद्रकांत गायकवाड, राजेंद्र शिंदे, आजीम पठाण, विजय मैराळ, आजीज शेख, बबनराव गवारे, गोपीनाथ शिंदे, सुभाष चोरडीया, मुरली वधवाणी, रमेश हरदास, शांताराम बकरे, शिवाजी सैद, सुभाष साळूंके, जाकीर शेख, जीनी वधवाणी, बबन नागले, विकी काळे, राजेंद्र वाघ, सुधीर गवारे, श्री.बडधे आदिंसह  धान्य दुकानदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*