संप सुरू ठेवण्याचा रेशन दुकानदारांचा निर्धार

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी संप सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. मात्र, हे रेशन दुकानदार ऑगस्ट महिन्यांतील धान्य खरेदीसाठी बँकेत चलन भरणार असले तरी गोदामातून माल उचल्याचा परवाना घेणार नाहीत. यामुळे रेशन दुकानदारांचा संप सुरू राहणार आहे.

संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकार्‍यांनी दोन दिवसांपूर्वी पुरवठामंत्र्याशी चर्चा केली होती. त्यातून मार्ग न निघाल्याने अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा चर्चा होणार असून मार्जिंगमध्ये वाढ करण्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. रेशनच्या धान्यापासून लाभार्थी वंचित राहू नये. यासाठी राज्याचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी चलन भरण्यास सुरवात करण्याबाबत सूचना रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. त्यानूसार जिल्ह्यातील रेशनदुकानदारांनी कार्यवाही सुरु केली आहे.

मात्र, चलन भरल्यानंतर धान्य उचलण्यासाठी देण्यात येणारे परमीट स्वीकारणार नसून संप सुरुच असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली. हमालांच्या कामबंद आंदोलनामूळे जुलै महिन्यांतील रेशनचा माल लाभार्थीयांना मिळण्यासाठी अगोदरच विलंब झाला.आता ऑगस्ट महिन्यातील माल तरी, वळेत मिळेल अशी आशा असतांना अद्याप मात्र, दुकानदारांच्या मागण्याबाबत ठोस निर्णय न झाल्याने दुकानदारांनी गोदामातून धान्य उचलण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही न केल्यास पुन्हा धान्य पुरवठ्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. गुरुवारी बहुतांश तालुक्यातील दुकानदारांनी चलन भरण्यास सुरवात केली आहे. याबाबत जिल्हा पुरवठा विभागानेही दुजोरा दिला आहे.

पुरवठा विभागाचा जीव भांड्यात! – धान्य वितरण करताना परवाना घेणार्‍या दुकानदारांचा तालुकानिहाय वाहतूक आराखडा तयार केला जातो. दरवेळी महिन्यांच्या 1 ते 10 तारखेपर्यत बहुतांशा दुकानदारांना बँकेत चलन भरुन माल घेतले जाते. त्यानूसार त्यांना रेशनचा माल वितरीत केला जातो. मात्र, 10 ऑगस्टचा दिवस उगवला असताना कोणतेच नियोजन न झाल्याने पुरवठा विभाग संभ्रम अवस्थेत होता. मात्र, संपावर ठाम राहिलेल्या दुकानदारांनी एक पाऊल मागे घेत चलन भरण्यास सुरवात केली.त्यामूळे पुरवठा विभागाला धीर आला आहे. मात्र, चलन भरल्यानंतर पुन्हा परवाना न स्वीकारल्यास संबधित विभागाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

निर्णय झाल्यास परवाना घेणार-देसाई –  जुलैचे चलन वेळेत भरले. मात्र, ठेकेदाराच्या चूकीमुळे माल उशिरा आला. हमालांनी काम बंद आंदोलन केले.त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही.लाभार्थीयांना वंचित ठेवण्याचा आमचा हेतु नाही.गतमहिन्याचा माल उशिरा मिळूनही दुकानदार प्रामाणिकपणे अद्याप वाटप करत आहे. संपाबाबत महिन्यापुर्वीच लेखी दिले असताना नोटिसा पाठविण्यात आल्या. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढतो. आहोत.राज्याध्यक्षांच्या सूचनेनुसार सध्या चलन भरण्यास सुरवात केली.मात्र, ठोस निर्णय होईपर्यत धान्य उचल्याचा परवाना घेणार नाही.क्किंटलमागे मिळणारे रक्कम कमी आहे.त्यामध्ये दुप्पट वाढ करावी अशी आमची मागणी कायम आहे. – देविदास देसाई, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना.

LEAVE A REPLY

*