रतन टाटा पाच राज्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारणार

0

मुंबईपाठोपाठ आता आसाम, राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातही टाटाची नवी रुग्णालये सुरु होणार आहे.

कॅन्सरसारख्या आजारावर गरिबातल्या गरिबाला इलाज करता यावा यासाठी टाटा ट्रस्टने हे पाऊल उचलले आहे.

या रुग्णालयांसाठी रतन टाटा यांनी केंद्र सरकारच्या मदतीसाठी एक हजार कोटी रुपये आणि इतर वस्तू देण्याचं आश्वासन दिलं आहे.

या पाच राज्यांमध्ये बनणाऱ्या कॅन्सर रुग्णालयात टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा असतील.

यामुळे या राज्यांमधील रुग्णांवर तिथेच उपचार होतील.

LEAVE A REPLY

*