श्रीरामपूर : मुख्याधिकार्‍यांच्या आश्‍वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील गोंधवणीकडे जाणार्‍या रस्त्याचे त्वरित मजबुतीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी काल मनसेच्यावतीने गोंधवणी येथे रास्ता रोको करण्यात आला. याप्रसंगी मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी चारपाच दिवसांत रस्त्याच्या काम सुरू होईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी गोंधवणी रस्त्याचे काम करण्यासाठी नगरपालिकेकडे निधी नसल्याकारणाने जमलेल्या नागरिकांकडून भीक मागून जमा झालेल्या पैशातून खड्डे बुजवावेत यासाठी जमलेले पैसे मुख्याधिकार्‍यांना देऊन नगरपालिकेचा निषेध करण्यात आला.
निवेदन मुख्याधिकारी सुमंत मोरे व नगरसेवक श्यामलिंग शिंदे, पोलीस निरीक्षक पथवे यांना देण्यात आले. त्याप्रसंगी या आंदोलनाची दखल घेऊन चारपाच दिवसांत रस्त्याचे काम चालू करू, असे आश्वसन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी दिले. आठ दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास पालिकेत गेट बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिला.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनसे उपजिल्हाध्यक्ष तुषार बोबडे, तालुकाध्यक्ष सोमनाथ धनगर, शहर अध्यक्ष प्रशांत कहाणे, डॉ. संजय नवथर, मनविसे उपजिल्हाध्यक्ष सागर खरात, सचिन धोत्रे, शिवाजी दांडगे, गणेश दिवसे, स्वप्निल सोनार, नीलेश सोनवणे, शिवनाथ फोपसे, अविनाश भोसले, गणेश सोलंकी, महेश सोनवणे, संतोष गुंजाळ, लाखन कडवे, किशोर कामे, चंदर शिंदे, दीपक शिंदे, भरत शिंदे, दशरथ शिंदे, लक्ष्मण शिंदे, रामदास शिंदे, संतोष कहाणे, प्रवीण कार्ले, गणेश राजभोज, राजू शिंदे, ताया शिंदे, बाळासाहेब लोंढे, बाळासाहेब दिधे, बाळू शेळके, राहुल शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*