रासबिहारीच्या ‘कुश’ची सातासमुद्रापार भरारी

0
नाशिक | रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमधील कुश गांधी याची रोटरी क्लब तर्फे रोटरी इंटरनॅशनल यूथ एक्स्चेंज प्रोग्रामसाठी निवड झाली आहे.

कुश नुकताच रासबिहारी शाळेतून दहावी पास झाला आहे. हा प्रोग्राम एक वर्षाचा असून कुश पोर्टलंड, यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरीका येथे जाणार आहे.

रोटरी क्लब, नागपूर येथे त्याची शैक्षणिक पात्रता चाचणी तसेच सामान्य ज्ञान, रुची आणि कौशल्ये या निकषांवर आधारीत मुलाखत घेण्यात आली.

नाशिकमधून एकूण चार विद्यार्थ्यांची निवड झाली, कुशने या चाचणी परिक्षेत १० पैकी १० गुण मिळवून पात्र ठरला. यावेळी कुश म्हणतो ही निवड चाचणी फार कठीण होती, परंतु माझ्या शाळेचे वातावरण व प्रात्यक्षिक शिक्षण यामुळे मला खूप मार्गदर्शन लाभले.

कुशच्या यशामुळे सर्वच स्तरातून कुशवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

LEAVE A REPLY

*