Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशभारतातच टेस्टिंग किट्सचे उत्पादन, 15 मिनिटांत होणार निदान

भारतातच टेस्टिंग किट्सचे उत्पादन, 15 मिनिटांत होणार निदान

सार्वमत

गुरुग्राम – करोना संकटाचा सामना करण्यासाठी भारताने चीनमधून सुमारे साडे सहा लाख अँटीबॉडी रॅपिड टेस्टिंग किट्स आयात केले होते. पण यातील बहुतेक टेस्टिंग किट निकृष्ट आढळल्याने चीनला परत केल्या जाणार आहेत. आता दक्षिण कोरियाच्या मदतीने या किट्सचे देशातच उत्पादन सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

दक्षिण कोरियाच्या एसडी बायोसेन्सर या कंपनीने हरयाणातील गुरुग्राममध्ये अँटीबॉडी रॅपिड टेस्टिंग किट्सचे उत्पादन सुरू केले आहे. विशेष म्हणजे फक्त 15 मिनिटांत या अँटीबॉडी रॅपिड टेस्ट किट्समधून निदान होतं, असा दावा एसडी बायोसेन्सर या कंपनीने केला आहे.
आम्हाला छत्तीसगड आणि हरयाणा सरकारकडून या किट्सची ऑर्डर मिळाली आहे. हरयाणा सरकारने 1 लाख किट्सची ऑर्डर दिलीय. यापैकी 25 हजार किट्स आतार्यंत पुरवण्यात आले आहेत. उर्वरीत किट्स लवकरच पाठवण्यात येतील. तसंच करोनावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर उत्पादनांवरही आयसीएमआरच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे, अशी माहिती एसडी बायोसेन्सर या कंपनीच्या मानेसरमधील प्रकल्पाचे प्रमुख अन्शुल सारस्वत यांनी दिली.

रॅपिड टेस्टिंग किट्स बनवणार्‍या दक्षिण कोरियातील जवळपास 29 कंपन्यांच्या उत्पादनांना जगभरात प्रचंड मागणी आहे. दक्षिण कोरियातील टेस्टिंग किट्सला अमेरिका, युरोपमध्ये मोठी मागणी आहे. भारत सरकारनेही दक्षिण कोरियातील च/ी र्कीारीळी उे. ङींव कंपनीशी करार केला आहे. ही कंपनी जवळपास 5 लाख टेस्टिंग किट्स भारताला पुरवणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या